Address: Gultekadi, Pune
शेतीमालातील भेसळ तपासणीसाठी प्रयोगशाळा
बाजार आवारात येणारा शेतीमाल भेसळमुक्त्त असावा या अनुषंगाने शेतीमालाची तपासणी करण्यासाठी राज्यात पहिलीच प्रयोगशाळा, प्रादेशिक कृषि उत्पन्न बाजार समिती पुणेने सुरू केली आहे. या प्रयोगशाळेत खालील शेतीमालाची तपासणी केली जाते. याकामी प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त केलेले आहेत.
मिरची पावडर, हळद पावडर, तेल, तुप, आटा, मैदा, साबूदाणा, धना पावडर,चहा पावडर या शेतीमालांचे दररोज नमुने बाजार आवारातून घेतले जातात व त्या नमुन्यांची तपासणी केली जाते.
शेतकर्यांसाठी शेतीमाल माती, पाणी परीक्षण प्रयोगशाळा
प्रादेशिक कृषि उत्पन्न बाजार पुणे येथे राज्यात पहिली माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा सुरू केली. या माती,पाणी परीक्षणामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्मांचा अंदाज येतो. खत व्यवस्थापानेमध्ये माती परीक्षणास अनन्य साधारण महत्व आहे.
बाजार आवारात येणार्या शेतकर्यांसाठी सदरची सुविधा नाममात्र दरात उपलब्ध कारून देण्यात आली आहे.
या प्रयोगशाळेत माती,पाणी परीक्षण करून त्यांच्या अहवालावरुन शेतकर्यांना खताबाबत किंवा जमीनी सुधारणेबाबत योग्य शिफारस करता येते आणि शेतातील उत्पादकता वाढविता येते. यासाठी प्रशिक्षित कर्मचार्यांची प्रयोगशाळेत नेमणुक करण्यात आलेली आहे.
Website: http://www.puneapmc.org/index.html